esakal | सकाळ इम्पॅक्ट : आरोग्यमंत्र्याचे डॉक्टरांच्या मानधन वाढीचा आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

sakal impact

सकाळ इम्पॅक्ट : आरोग्यमंत्र्याचे डॉक्टरांच्या मानधन वाढीचा आदेश

sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर : राज्यातील मानसेवी डॉक्टरांच्या मानधन वाढीच्या महत्वपुर्ण निर्णयावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वी फाईलवर सही केली होती, त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते, त्या आदेशानुसार 3 सप्टेंबर रोजी मानधन वाढीचे आदेश धडकले आहेत. या आदेशामुळे राज्यातील मानसेवी डॉक्टरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या डॉक्टरांच्या मानधन वाढीचा मुद्दा सुरवातीपासून सकाळने लावून धरला होता, आज तो पूर्णत्वास गेला आहे.

राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यातील नवसंजीवनी योजने अंतर्गत कार्यरत असलेल्या मानसेवी डॉक्टरांच्या मानधन वाढीचा निर्णय मागील वर्षीच्या 16 सप्टेंबरला सरकारने घेतला. मात्र यावर्षीचा सप्टेंबर महिना उजाडला असूनसुद्धा मानधन वाढ लागू करण्यात आली नव्हती. त्यामुळे राज्यातील मानसेवी डॉक्टर 16 सप्टेंबर रोजी वर्षश्राद्ध करून निषेध करणार होते.

याबाबतचे वृत्त सकाळमध्ये प्रकाशित करण्यात आले होते. मात्र वर्षश्राद्ध करण्यापूर्वीच राज्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉक्टरांची दखल घेत मानधन वाढीवर सही केली. सोबतच दोन तीन दिवसात आदेश धडकणार असल्याचे वृत्त सुद्धा सकाळमध्ये प्रकाशित करण्यात आले होते. अखेर 3 सप्टेंबर रोजी तो आदेश धडकला. या निर्णयामुळे राज्यातील 281 डॉक्टरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्यामध्ये 22 डॉक्टर हे मेळघाटातील आहेत.

हेही वाचा: हिंगोलीत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

दोन दिवसापूर्वी आरोग्यमंत्र्यांनी फाईलवर सही केली होती. त्यांनी सांगितल्यानुसार दोन तीन दिवसात आदेश पारित होतील. मात्र शुक्रवारीच आदेश पारित झाले आहेत. या निर्णयामुळे डॉक्टरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

- डॉ. प्रमोद शिंदे, सचिव, मानसेवी वैद्यकीय संघटना नाशिक.

loading image
go to top