
65-Year-Old Farmer Commits Suicide Under Debt and Crop Loss Stress
Sakal
साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या ग्राम शिंदी येथील ६५ वर्षीय शेतकऱ्याने ऐन दिपावलीच्या दिवशी शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. परिसरात या हंगामात अतीवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांचे संपूर्ण नुकसान परिणामी डोक्यावर असलेला कर्जाचा भार कमी करण्याची क्षमता नसल्याने शिंदी येथील या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याचे वृत्त आहे.