थांब तुझे फोटोच व्हायरल करतो, वर्गमित्राने दिली धमकी...मग

file photo
file photo
Updated on

साकोली (जि. भंडारा) : मोबाईलमध्ये एकत्रित काढलेला फोटो व्हायरल करू, वडिलांना दाखवू, असे धमकाविल्याने भीतीपोटी अल्पवयीन विद्यार्थिनीने विष पिऊन आमत्महत्या केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी (ता. 5) दुपारी साडेतीनच्या सुमारास साकोली तालुक्‍यातील चारगाव येथे घडली. विशेष म्हणजे, मृत मुलीला धमकाविणारा विद्यार्थी हासुद्धा अल्पवयीन आहे.

प्राप्त माहितीनुसार, चारगाव येथील ही 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी साकोली येथील नंदलाल पाटील कापगते विद्यालयात अकराव्या वर्गात शिकत होती. शिक्षणासाठी ती चारगाव येथून साकोली येथे ये-जा करीत होती.

तिला धमकाविणारा अल्पवयीन विद्यार्थी हासुद्धा तिचा वर्गमित्र आहे. वर्गात मैत्री असल्याने त्याने विद्यार्थिनीशी जवळीक साधून मोबाईलवर एकत्रित फोटो काढले.

फोटो मुलीच्या मोबाईलवर पाठविला

या फोटोचा बहाणा शोधून अल्पवयीन विद्यार्थ्याने पीडित मुलीला माझ्याशी संबंध न ठेवल्यास हा फोटो व्हायरल करू, अशी भीती विद्यार्थिनीला दाखविली. तो फोटो मुलीच्या मोबाईलवर पाठवून शिवीगाळसुद्धा केली. तसेच तिच्या वडिलांना तो फोटो पाठविण्याचीही धमकी दिली. या प्रकारामुळे विद्यार्थिनी घाबरून कमालीची दहशतीत होती.

त्रासाला कंटाळून घेतले विष

विद्यार्थ्याच्या त्रासाला कंटाळून तिने आपल्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. मुलीच्या मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला आहे.

या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रेवतकर करीत आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्याने असे का केले की अल्पवयीन विद्यार्थिनीला आत्महत्या करावी लागली याची चर्चा गावात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com