समृद्धी महामार्ग नाही, आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मार्ग 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 डिसेंबर 2019

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी गृहमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारच्या डिसेंबरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

नागपूर : नागपूर ते मुंबई प्रवास जलदगतीने व्हावा, यासाठी समृद्धी महामार्गाचे बांधकाम करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकाने घेतला होता. त्याची सर्व प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाला देखील सुरुवात झाली आहे. फडणवीस सरकारचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या प्रकल्पाचे आता नामकरण करण्याचे ठरले आहे. यापुढे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' म्हणून ओळखला जाणार आहे. 

राज्य सरकारच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारी जारी केला. त्याचप्रमाणे या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या वतीने साडेतीन हजार कोटी रुपये इतकी रक्कम भागभांडवली अनुदान म्हणून देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचाही शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 

अधिक माहितीसाठी - अध्यक्ष महोदय, मी घोटाळा केला नाही

साडेतीन हजार कोटी रुपये अनुदान म्हणून देणार

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी गृहमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारच्या डिसेंबरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा महामार्ग "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' या नावाने ओळखला जाणार आहे. त्याचप्रमाणे, या प्रकल्पावरील कर्जाचा भर काही प्रमाणात हलका करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने साडेतीन हजार कोटी रुपये इतकी रक्कम भागभांडवली अनुदान म्हणून देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला होता. याही निर्णयासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 

अधिक माहितीसाठी - राज्यपाल अचानक चढले जलकुंभावर, काय आहे कारण?

अभिमान वाटेल असे काम करणार

नागपूर-मुंबई महामार्गाचे काम दर्जेदार पद्धतीने केले जाईल. या महामार्गावर कृषी समृद्धी केंद्र उभारले जाणार आहेत. याच्या माध्यमातून सुमारे पाच लाख लोकांना थेट रोजगार मिळेल. सर्वांना अभिमान वाटेल अशा दर्जाचे काम समृद्धी महामार्गाचे केले जाईल, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (ता. 21) विधानसभेत दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samruddhi highway project will known as Balasaheb Thackeray Marg