Samrudhhi Highway Rain : पावसाचा हाहाकार! समृद्धी महामार्गाला नदीचे स्वरुप; वाहनांच्या लांबच लांब रांगा, शेतीचेही मोठे नुकसान

Monsoon Update : वाहनांच्या बोटेनमध्ये पाणी शिरल्याने वाहने बंद पडून अडकल्याने मेहकर-खामगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली, वाहनांचेही मोठे नुकसान झाले. शेतात पाणी घुसून पेरणी झालेल्या शेतांचे अतोनात नुकसान झाले आहे.
Samrudhhi Highway Rain : पावसाचा हाहाकार! समृद्धी महामार्गाला नदीचे स्वरुप; वाहनांच्या लांबच लांब रांगा, शेतीचेही मोठे नुकसान
Updated on: 

राज्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, दरम्यान विदर्भातही दमदार पावसाने हजेरी लावली असून बुलढाण्यातील मेहकर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस पडला त्यामुळे समृद्धी महामार्गावरील साब्रा-फरदापूर इंटरचेंजजवळील पुलाखाली पाणी साचल्याने महामार्गाला नदीचे स्वरुप प्राप्त झाले. त्यामुळे अनेक वाहने अडकून पडली. वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com