

Washim
esakal
रिसोड: समृद्धी महामार्गाने अनेकांची समृद्धी केली असली, तरी या महामार्गाची उंची वाढल्यामुळे लगतचे व वरील जवळपास ३० ते ४० किलोमीटर परिसरातील पाणी थेट नदी बाहेरी येऊन शेतकऱ्यांच्या शेतात घुसत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. हा महामार्ग शेतकऱ्यांसाठी अधोगतीचा मार्ग ठरला असल्याचे बोलले जात आहे.