Samruddhi Mahamarg Truck Driver RTO Dispute
esakal
समृद्धी महामार्गावर आरटीओ अधिकाऱ्यांशी झालेल्या वादानंतर एका ट्रक चालकाने चक्क ट्रक रस्त्यावर आडवा लावल्याची घटना रविवारी घडली होती. या प्रकारामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं होतं. या घटनेची राज्यभर चर्चा रंगली. मात्र, आता आरटीओ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात बाजू स्पष्ट केली आहे.
समृद्धी महामार्गावर नेमकं काय घडलं आणि ट्रक चालकाची कागदपत्रे आरटीओ अधिकाऱ्यांनी का ताब्यात घेतली, याबाबत आरटीओ अधिकारी संदीप मुखे यांनी ‘सकाळ’शी बोलताना माहिती दिली.