video :अबब...! रेती माफियांनी केला चक्क पोलिसांना चिरडून ठार करण्याचा प्रयत्न

truck akola police sand
truck akola police sand

हिवरखेड (जि.अकोला) ः हिवरखेड परिसरात अवैध  रेती तस्करीला उधाण आले असून बेलगाम रेती माफियांनी पोलिसांना वाहनाखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये हिवरखेडचे पोलीस कर्मचारी आकाश राठोड हे जखमी झाले असून आकाश राठोड आणि निलेश खंडारे  या पोलिसांच्या दोन मोटरसायकलींचे मोठे नुकसान झाले आहे.

सविस्तर घटना अशी की हिवरखेड येथे कार्यरत पोलिस कॉन्स्टेबल आकाश राठोड हे 20 मार्च रोजी कर्तव्यावर असताना त्यांना दानापूर- हिंगणी रोडवर चोरीच्या रेतीचे टिप्पर क्रमांक MH 28 BB 1419 आणि एक विना क्रमांकाच्या टिप्पर असे दोन टिप्पर अवैध वाहतूक करताना दिसून येताच त्यांनी दोघांना थांबण्याचा इशारा केला. परंतु अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांनी वाहने न थांबता भरधाव वेगाने आकाश राठोड यांना वाहन खाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न करीत पसार झाले. आकाश राठोड यांनी त्या भरधाव वाहनाचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने पोलिस कॉन्स्टेबल आकाश राठोड यांना कट मारत मोटरसायकलवरून खाली पाडले. 

एवढ्यात रेती तस्करांनी हिंगणी येथे वाहनातून अर्धी रेती खाली करून टाकली. आकाश राठोड यांनी स्वतःला सावरत पुन्हा रेती तस्करांचा पाठलाग केला तेव्हा तळेगाव ते गोर्धा दरम्यान तस्करांनी आकाश राठोड यांना ठार मारण्याच्या उद्देशाने पुन्हा जोरदार कट मारला ज्यामध्ये आकाश राठोड हे मोटर सायकल सह कोसळले. यामध्ये ते जखमी झाले आणि त्यांच्या मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु आकाश राठोड यांनी पुन्हा वाहनाचा पाठलाग जखमी अवस्थेतही सुरू ठेवला.

हे वाहन दानापूर, हिंगणी नंतर तळेगाव मार्गे मालठाणा वरून अडगावकडे जात असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आडगाव चौकीला फोन करून नाकाबंदी करण्यास सांगितले. यावेळी निलेश खंडारे पोलीस कर्मचाऱ्याने रेतीचे वाहन अडविण्याच्या उद्देशाने स्वतः मोटर सायकल रस्त्यावर आडवी उभी केली आणि वाहनाला थांबण्याचा इशारा केला पर्यंत रेती तस्करांनी निलेश खंडारे यांना सुद्धा वाहनासह चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु निलेश खंडारे यांना याची जाणीव होताच ते तात्काळ बाजूला सरकल्याने त्यांचे प्राण कसेबसे वाचले. तरीही आकाश राठोड यांनी पाठलाग सुरूच ठेवला. आकाश राठोड हे जखमी झाल्याचे पाहताच रेती तस्करांनी शक्कल लढवून वेगवेगळ्या दिशेने धाव घेतली ज्यामुळे एक रेती तस्करीचे वाहन घेऊन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. मोठ्या अडगाव नंतर लहान अडगाव, सिरसोली, मुंडगाव, लामकानी, रौंदळा आदी गावामार्गे वाहन पळवीत पोलिसांना चकविण्याचा प्रयत्न केला. शेवटी आरोपींनी वाहनातील बरीच रेती रस्त्यातच खाली करून आरोपी वाहन बेवारस अवस्थेत सोडून घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेत सुदैवाने प्राणहानी झाली नाही. एक टिप्पर घेऊन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले तर दुसरे एक टिप्पर पोलिसांनी जप्त केले असून हिवरखेड ठाण्यात आणले आहे. शुक्रवार 20 मार्च रोजी रात्री उशिरा सदर घटनेची नोंद करून भारतीय दंड विधान 307, 353, 379, 186, 427, 34 नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैद्य धंदे बंद अवैध धंदे चालू?
मागील काही वर्षात विविध अवैध धंद्यांना उत आला असून पोलिसांनी हल्ल्याची ही पहिलीच घटना नाही. या आधीही तस्करीतील आरोपीने पोलिसांना मारहाणीचा प्रकार घडले आहेत. या आधीही तत्कालीन नायब तहसीलदारांना सुद्धा येथे रेती माफियांनी ठार करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची नोंद पोलिस दप्तरी असून अनेक पोलिसांना पत्रकारांना अधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार वेगवेगळ्या क्षेत्रातील अवैध धंदे वाईकांकडून निरंतर सुरूच राहतात. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास सर्व वैध धंदे आणि प्रतिष्ठनांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बंद करण्याचे आदेश दिलेले असताना हिवरखेड परिसरात सर्वच प्रकारचे अवैध धंदे मात्र तेजीत असून त्यांना कोणत्या यंत्रणांचे आशीर्वाद आहेत आणि हे सर्व क्षेत्रातले अवैध धंदे कधी बंद होणार असा प्रश्न त्रस्त नागरिक विचारीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com