Yavatmal: संदीप शिंदे यांचा हाँगकाँग येथे गौरव; आंतरराष्ट्रीय ‘द वन ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड’, ५० हजार यूएस डॉलर्सचे बक्षिस
Sandeep Shinde Receives International Recognition: यवतमाळमधील नंददीप फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे यांना हाँगकाँगमधील ‘द वन ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड’ने सन्मानित केले. अवघ्या पाच वर्षांत सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामासाठी ५० हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले.
यवतमाळ : येथील नंददीप फाऊंडेशनमार्फत संचालित बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राचे अध्यक्ष संदीप शिंदे यांना हाँगकाँग येथील ‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३४५०’तर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘द वन ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.