राऊतांचा मुनगंटीवारांना प्रश्न; खूप झाली भविष्‍यवाणी, सांगा कधी पडेल आमचे सरकार

sanjay Rauts question to Mungantiwar Tell us when our goverment will fall political news
sanjay Rauts question to Mungantiwar Tell us when our goverment will fall political news

नागपूर : राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून जो तो हे सरकार टिकणार नाही, आघाडीत बिघाडी येईल, तीनचाकी सरकार फार काळ चालणार नाही, असे विधान करीत आहे. मात्र, या सरकारला जवळजवळ दीड वर्ष होत आहे. सरकारचे कामकाज चांगले चालत आहे. यात काहीही बिघाडी झालेली नाही. हे सरकार पाच वर्ष टिकेल, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.

विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत आम्हाला होते. महाविकासआघाडी बेईमानी सत्तेत आली. जनहित विरोधी सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. हे सरकार पडेल आणि चार महिन्यांनंतर भाजप सत्तेत येईल, असा विश्वास भाजत नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला होता. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली.

महाविकासआघडीचे सरकार दोन महिन्यांत, सहा महिन्यांत पडेल आणि आम्ही पुन्हा येऊ, पुन्हा येऊ, पुन्हा येऊ असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासून म्हणत आले आहे. मात्र, अद्याप तरी तसे काहीही झालेले नाही. यात अनेक भाजप नेते उडी घेऊन सरकारविषयी भविष्यवाणी करीत आहे. कोणते ना कोणते विधान करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा विरोधकांनी आता तारखा देणे बंद करावे, असेही संजय राऊत म्हणाले.

सुधीर मुगंटीवार यांनी पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर आहे. भाजपचे मिशन महाराष्ट्र सुरू झाले आहे. जनहित विरोधी सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. हे सरकार तीन ते चार महिन्यांत पडेल असे विधान केले. हा त्यांचा आजपर्यंतचा चांगला विनोद होता. लवकरच महाराष्ट्रात नाट्यगृह सुरू होत आहेत. या नाट्यगृहात सुधीरभाऊंचे विनोदी ठेवले तर नागरिकांची चांगली गर्दी होईल, असेही ते म्हणाले.

भाजपने चिंता करण्याची गरज नाही

बहुमत आम्हाला होते. मात्र, हे सरकार बेईमानीने सत्तेत आले. अन्यायकारक सरकार टिकवणे हे सुद्धा आमच्या हातून सर्वांत मोठी घोडचूक होईल. जनहित विरोधी सरकारविरोधात शक्तीने लढावेच लागेल. भाजप लवकरच सत्तेत येईल असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. मात्र, पुढील साडेतीन वर्ष हे सरकार अत्यंत मजबुतीने चांगले काम करेल. सुधीरभांऊनी किंवा भाजपने त्यांची चिंता करू नये.

साडेतीन वर्ष या राज्यातील वातावरण खेळीमेळीचं असेल

सुधीरभाऊ उत्तम विनोदी भूमिका करतात. कधी कधी खलनायकही सिनेमा पुढे घेऊन जातो. आम्ही जेव्हा सिनेमा पाहायचो तेव्हा प्राण, शक्ती कपूर, अमरीश पुरी, निळू फुले, राजशेखर हे खलनायक होते. खलनायकांवरही सिनेमे चालत असतात. त्यामुळे विरोधकाचा हा महासिनेमा आहे. सुधीर मुनगंटीवार किंवा देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार यांनी राज्यात आपआपल्या भूमिका वठविल्या आहेत. त्यामुळे पुढील साडेतीन वर्ष या राज्यातील वातावरण हे खेळीमेळीचं असेल, असे संजय राऊत यांनी नमुद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com