esakal | उन्हाळ्यात घ्या पावसाळ्याचा आनंद; प्रादेशिक हवामान विभागाचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Chance of thunderstorms in Vidarbha today and tomorrow

विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील पारा ४० अंशापर्यंत जाऊन पोहोचला होता. विदर्भातील अकोला, चंद्रपूर जिल्ह्यातील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

उन्हाळ्यात घ्या पावसाळ्याचा आनंद; प्रादेशिक हवामान विभागाचा इशारा

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’च्या तीव्र प्रभावामुळे विदर्भात पुढील दोन-तीन दिवस मेघगर्जनेसह वादळी पावसाची दाट शक्यता आहे. तसा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे नागपूरसह अनेक ठिकाणच्या कमाल तापमानात किंचित घसरण झाली आहे. दमट वातावरणामुळे उकाडा वाढला असून, बुधवारी दिवसभर अंगातून घामाच्या धारा वाहिल्या.

हवामान विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, उत्तर पाकिस्तान व आजूबाजूच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे ‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’ तयार झाले असून, त्याचा प्रभाव विदर्भासह, मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये जाणवणार आहे. त्यामुळे गुरुवार ते शनिवारदरम्यान विदर्भात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे. विशेषतः नागपूर, अमरावती, गोंदिया, अकोला, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची दाट शक्यता आहे. इतरही जिल्ह्यांत सायंकाळच्या सुमारास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

जाणून घ्या - आता WhatsAppचे काही वर्षांआधी पाठवलेले मेसेजही करा डिलीट; या स्टेप्स नक्की करा फॉलो

उल्लेखनीय म्हणजे, यावेळी गारपिटीचा इशारा नसल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासा म्हणावा लागेल. पावसाळी वातावरण शनिवारपर्यंत कायम राहणार असून, त्यानंतर ऊन्हाचा तडाखा वाढणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यात अकोल्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पारा ४० अंशांच्या वर गेलेला आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे नागपूरसह अनेक ठिकाणच्या कमाल तापमानात किंचित घसरण झाली आहे. दमट वातावरणामुळे उकाडा वाढला असून, बुधवारी दिवसभर अंगातून घामाच्या धारा वाहिल्या.

विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील पारा ४० अंशापर्यंत जाऊन पोहोचला होता. विदर्भातील अकोला, चंद्रपूर जिल्ह्यातील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात यंदा सरासरीपेक्षा तापमान जास्त राहणार असल्याची शक्यता नागपूर हवामान विभागानं वर्तवली आहे.

जाणून घ्या - मृत वाघाचा ‘बेपत्ता’ झालेला पाय सापडला; दोन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

यावर्षी खरीप हंगामात पावसामुळे सोयाबीन, कापूस, मूग व उडदासह तुरीचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू व हरभऱ्यावर शेतकऱ्यांची भिस्त अवलंबली आहे. हरभऱ्याची पेरणी यंदा गव्हाच्या तुलनेत अधिक असून काही भागांतील हरभरा कापणीवर आला आहे, तर काही ठिकाणी तो विक्रीसही आला आहे. गव्हाची पेरणी आटोपली असून काही भागांतील गहू ओंबीवर आला आहे. गव्हाला सर्वाधिक धोका गारपिटीचा असून अवकाळी पावसासोबत गारपिटीचीही शक्‍यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांचे धाकधूक वाढली आहे.

loading image
go to top