Sant Gajanan Maharaj: पाणी देण्यास नकार दिला... संत गजानन महाराजांनी कोरडी विहीर सजल केली, प्रकट दिनानिमित्त अवश्य दर्शन घ्या…

Sant Gajanan Maharaj Sajjal Vihir Miracle: History, Prakat Din Celebrations & Devotee Guide : श्री संत गजानन महाराज यांची सजल विहीर कथा: शांतीवन अमृततीर्थाचा इतिहास, प्रगट दिन महोत्सव आणि भक्तांसाठी संपूर्ण मार्गदर्शक
Sant Gajanan Maharaj

Sant Gajanan Maharaj

esakal

Updated on

बोडर्डी, ता. ७ : सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथील घनदाट जंगलात संत श्री गजानन महाराजांच्या पादस्पर्शामुळे पूण्य झालेली भूमी म्हणजे 'शांतीवन अमृततीर्थ'; त्या काळामध्ये भीषण दुष्काळ पडलेला असताना जंगलामध्ये गजानन महाराज आले असता त्यांना तहान लागली होती. त्यामुळे त्यांना एक व्यक्ती दिसला आणि ते त्यांच्या जवळ जाऊन पाणी मागू लागले. त्यावेळी त्या व्यक्तीने पाणी देण्यास नकार दिला आणि कोरडी पडलेली विहीर महाराजांना दाखवली. त्यावेळी महाराजांनी कोरड्या पडलेल्या विहिरीला जीवनदान देऊन पुन्हा ती सजल केली. तेव्हापासून तेथे शांतीवन अमृत तीर्थ असे नाव पडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com