गोंदिया जिल्ह्यातील सारस उडाले मुंबईत

महेश येडे
बुधवार, 5 एप्रिल 2017

१ हजार १३० शाळांमध्ये संवर्धनावर माहिती - राकेश चुटे यांचा उपक्रम
रावणवाडी - केवळ गोंदिया जिल्ह्यात आढळून येणाऱ्या सारसाने आता मुंबईत भरारी घेतली आहे. घाटटेमणी येथील मूळ रहिवासी राकेश चुटे हे मुंबईच्या बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये शिक्षण विभागात कार्यरत आहेत. मुंबईतील ११३० शाळांमध्ये श्री. चुटे यांनी १ एप्रिलला ऑनलाइन वरच्युअर क्‍लॉस रूममध्ये सारस संवर्धनावर सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी एकदा तरी प्रत्यक्षात सारस पहाता यावे, अशी इच्छा व्यक्त केल्याचे चुटे यांनी सांगितले.         

महाराष्ट्र राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यात सारसाचे वास्तव्य आहे. सारस संरक्षण व संवर्धनासाठी गोंदियात सारस महोत्सवाची सुरुवातही प्रशासनाने केली. घाटटेमणी येथे १३ वर्षांपूर्वी सारसाची जोडी आढळली होती. २००५ पासून घाटटेमणी येथील राकेश चुटे यांनी आपल्या मित्रांसह  सारस संवर्धनाला सुरुवात केली होती. याचाच एक भाग म्हणून, जिल्ह्यातील चिरामणटोला, परसवाडा, झिलमिली, घाटटेमणी, रावणवाडी, गोंडीटोला तलाव परिसरात सारस जोडी हमखास दिसून येते. सारसाला पाहण्याकरिता महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे  तर, अन्य राज्यातील पर्यटक,  प्रेमी मोठ्या संख्येने गोंदियात गर्दी करतात.  

उल्लेखनीय म्हणजे, देशात सारसांची संख्या अत्यल्प असल्याने सारस संवर्धन करण्याची आवश्‍यकता आहे. हे ओळखून घाटटेमणी येथील राकेश चुटे यांनी २००५ पासून सारस संवर्धनाला सुरुवात केली. आजही तलाव परिसरात सारस जोडी आढळून येते. कामठा परिसरातील तलावाशेजारी ही संख्या अधिक असल्याची माहिती आहे. राकेश चुटे सध्या मुंबई येथील बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये शिक्षण विभागात कार्यरत आहेत. त्यांनी मुंबई येथील १ हजार १३० शाळांमध्ये १ एप्रिल रोजी ऑनलाइन वरच्युअर क्‍लासरूममध्ये सारस संवर्धनावर सविस्तर  माहिती दिली. त्यामुळे मुंबईच्या विद्यार्थ्यांना गोंदियाच्या सारसबद्दल आकर्षण वाटू लागले आहे.

आपल्याला एकदा तरी, सारस पाहता यावे, अशी इच्छा विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्याचे चुटे यांनी सांगितले. 

विशेष म्हणजे, कामठा, रावणवाडी परिसरात तलावांची संख्या अधिक असल्याने सारस जोडीला भ्रमण करणे सोपे होत आहे. त्यामुळे सारसांनी आपला डेरा या ठिकाणी मांडल्याचे बोलले जाते.

Web Title: saras in mumbai