

Vidarbha
esakal
शेगाव: येथील स्टेट बँकेच्या मेन रोड वरील शाखेच्या एका कर्मचाऱ्याने ता २९ मे रोजी वाहन पार्किंग मध्ये पडलेले लोहारा येथील एका बँक ग्राहकाचे एक लाख रुपये प्रामाणिकपणे परत केले. याबाबत माहिती अशी की, ता.२९ मे रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान लोहारा ता.बाळापूर येथील अरुण लक्ष्मण बकाल यांनी बँक मधून शेतीच्या कामानिमित्त दोन लाख रुपयांचा विड्रॉल केला.