esakal | पंचायत समिती कक्षात भरविली शाळा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पंचायत समिती कक्षात भरविली शाळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जिवती (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील येलापूर (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेत सातव्या वर्गापर्यंत वर्ग आहे. शाळेची पटसंख्या 118 आहे. सध्या येथे तीनच शिक्षक कार्यरत आहेत. एक शिक्षक सुट्टीवर गेले आहे. त्यामुळे उर्वरित शिक्षकांना वर्ग सांभाळतांना बरीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी पंचायत समिती कक्षात शाळा भरविली.
येत्या दोन दिवसांत शिक्षकांची नियुक्ती न झाल्यास शाळेला कुलूप ठोकू असा इशारा पालकांनी दिला आहे. कक्षप्रमुख खडसे यांना पालकांनी शिक्षक नियुक्तीसंदर्भात लेखी दिले. गटविकास अधिकारी बैठकीसाठी चंद्रपूर येथे गेले होते. त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. तेव्हा त्यांनी शिक्षक पाठविण्याची हमी दिली.
दोन दिवसांपूर्वीच दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यापैकी एक शिक्षक रुजू झालेत. लगेच दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती करून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
- सुरेश बागडे,
सहायक गटविकास अधिकारी, जिवती

loading image
go to top