शाळेच्या प्रांगणात पोहोचताच शिक्षकांचा उडाला थरकाप

शाळेच्या प्रांगणात पोहोचताच शिक्षकांचा उडाला थरकाप

वणी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील साखरादरा येथील आदर्श शाळेच्या प्रांगणात वाघाच्या पायाचे ठसे आढळले. ही भयभीत करणारी बाब गुरुवारी दुपारी शिक्षकांच्या निदर्शनास आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. परिसरात वाघाच्या मुक्तसंचारामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला तर नागरिक भयभीत झाले आहेत. (School-premises-Tiger-footprints-Fear-in-teachers-students-movement-of-the-tiger-nad86)

साखरादरा येथील आदर्श शाळेच्या प्रांगणात दुपारी वाघाच्या पायाचे ठसे आढळताच शिक्षकांनी याबाबत ग्रामस्थांना सूचित केले. त्याप्रमाणेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या गंभीर बाबीची कल्पना देण्यात आली. २४ तास लोटल्यावरही वनविभागाच्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देण्याचे सौजन्य दाखवले नाही.

शाळेच्या प्रांगणात पोहोचताच शिक्षकांचा उडाला थरकाप
शक्तिमानचा मृत्यू; अंत्यसंस्काराला पोलिसांचा ताफा, गॅंगवॉर भडकणार

वणी उपविभागात सातत्याने वाघांचा मुक्तसंचार सुरू असतो. झरीजामनी तालुक्यातील पिवरडोल या गावातील अविनाश पवन लेनगुरे या १७ वर्षीय तरुणाला लक्ष केले होते. अशा घटना या परिसरात नेहमीच घडताना दिसत आहे. अनेक व्यक्तींना जायबंदी तर जनावरांचा फडशा वाघाने पाडला आहे.

साखरादरा या गावात चक्क शाळेच्या प्रांगणात वाघाच्या पायाचे ठसे आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने मुक्तसंचार करणाऱ्या त्या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

(School-premises-Tiger-footprints-Fear-in-teachers-students-movement-of-the-tiger-nad86)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com