

चंद्रपूर : शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त करून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत मानधनावर कर्मचारी नेमण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात चंद्रपूर जिल्हा शिक्षण संस्था, संचालक संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारी (ता. १८) राज्यभरातील शाळा एक दिवसांसाठी बंद ठेवण्यात येतील. यानंतरही सरकारने निर्णय मागे न घेतल्यास चार जानेवारीपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे.
राज्य सरकारने ११ डिसेंबरला चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांबाबतचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची आहे. त्यासाठी राज्यात एकदिवसीय शाळा बंद आंदोलन केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य खासगी शाळा नियमावली १९८१ शाळा संहिता हा कायदा किंवा किमान वेतन कायदा यामध्ये विधिमंडळाने कोणताही बदल केलेला नाही. अशा परिस्थितीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील कर्मचारी मानधनावर नेमण्याचा निर्णय हा बेकायदेशीर ठरत असल्याचे संघटनेचे मत आहे.
माध्यमिक शाळा संहितेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदाची संख्या निश्चित करण्याबाबतचे निकष आणि नियुक्तीची कार्यप्रणाली देण्यात आली आहे. या संहितेत आणि कायद्यात कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. कायद्यात बदल करण्याचे निकष न पाडता नवीन शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्यामुळे हा शासन निर्णय असंविधानिक आहे. या आदेशानुसार शिपाई पदाचे ठरलेले भत्ते प्रचलित कोणत्याही कायद्यानुसार नमूद केलेले नाही.
सद्यःस्थितीत अनेक शाळांमध्ये अत्यावश्यक असलेली पदे ही चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची आहेत, असे असतानाही ही पदे रद्द करण्यात आली आहेत. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी एकदिवसीय बंद आंदोलन केले जाईल. त्यानंतरही सरकारने निर्णय मागे न घेतल्यास चार जानेवारीपासून बेमुदत शाळा बंद ठेवण्यात येईल, असा इशारा चंद्रपूर जिल्हा शिक्षण संस्था संचालक संघाचे अध्यक्ष प्रा. अनिल शिंदे, सचिव प्रा. सूर्यकांत खनके यांनी दिला आहे.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.