esakal | विदर्भात स्क्रॅब टायफसची एन्ट्री?
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

विदर्भात स्क्रॅब टायफसची एन्ट्री?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धामणगावरेल्वे (अमरावती) : संसर्गजन्य आजारांनी आधीच अमरावतीकरांचा जीव मेटाकुटीस आला आहे. तालुक्‍यातील चिंचोली येथे जपानी एन्सेफेलायटीस आजार आल्यानंतर आता वाघोली गावात स्क्रॅब टायफससदृश आजाराच्या दहशतीचे ढग दाटून आले आहेत. स्क्रॅब टायफससदृश आजाराने वाघोली येथील एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
तालुक्‍यातील वाघोली येथील आरती निशांत हेंडवे (वय 25) या महिलेचा स्क्रॅब टायफससदृश आजारामुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपूर्वीच तालुक्‍यातील चिंचोली येथे जपानी एन्सेफेलायटीससदृश तापाचे दोन रुग्ण आढळले होते. आता वाघोली गावात स्क्रॅब टायफस या नव्या आजारामुळे खळबळ उडाली आहे.
स्क्रॅब टायफस झालेल्या रुग्णांना कावीळ व श्‍वसनाचा त्रास होतो. 35 टक्‍के रुग्णांना एआरडीएस (ऍक्‍युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम) होतो. काही लोकांना किडनीचा त्रास होतो. 30 टक्‍के लोकांमध्ये शरीरातील अनेक अवयव निकामी होतात. वेळीच योग्य उपचार न झाल्यास 50 टक्‍के रुग्ण दगावतात. 25 टक्‍के रुग्णांना मेंदूविकार होतो. रक्ततपासणी आणि श्‍वसनाच्या लक्षणांवरून रोगनिदान करता येते, अशी माहिती आहे. तथापि, रक्ततपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरती हेंडवे यांचा मृत्यू नेमका कशाने झाला, याबाबत माहिती मिळणार आहे.

ही आहेत लक्षणे
चिगर नामक कीटक चावल्यानंतर 5 ते 20 दिवसांनी या आजाराची लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणे, ओकाऱ्या आणि इतर ज्वरासारखी लक्षणे असतात. त्यामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये मलेरिया, विषमज्वर किंवा डेंगी असण्याची शक्‍यता वर्तविली जाते. ज्या ठिकाणी चिगर चावतो, त्याठिकाणी एक व्रण असतो. त्याला हशर म्हणतात. परंतु, 40 टक्‍के रुग्णांमध्ये हा हशर दिसत नाही. या आजारासाठी प्रतिबंधक लस नाही. लवकर निदान, जनजागरण आणि उंदरांवर नियंत्रण राखणे गरजेचे आहे.

loading image
go to top