
गडचिरोली : ‘सर्च’ संचलित माँ दंत्तेश्वरी हॉस्पिटलमध्ये ४ जुलैला प्रभा भरतकुमार आचाटी (वय ६१) यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ही शस्त्रक्रिया ‘सर्च’ आणि स्पाईन फाउंडेशनसाठी मैलाचा दगड ठरला, याचे कारण म्हणजे या हॉस्पिटलमधील ही मणक्याची ५०० वी शस्त्रक्रिया होती.