
साकोली : रुग्णालयात सोनोग्राफी तपासणीसाठी गेलेल्या युवतीचा विनयभंग करणाऱ्या साकोली येथील श्याम हॉस्पिटलचा संचालक डॉक्टर देवेश अग्रवाल यांच्या शोधासाठी भंडारा जिल्हा पोलिसांनी आता लुक आउट जारी केले आहे. यासोबतच त्याच्या शोधासाठी ८ पथके तयार केली असून ती रवाना झाली आहेत.