esakal | दुसऱ्यांदा झालेल्या तपासणीत ‘त्या’ पाचही नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

corona negative.jpg

सहा लोकांची नावे दिल्ली वरून जिल्हा प्रशासनाकडे आली व जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाला सदर लोकांचे बाबत माहिती देताच आरोग्य विभाग पथकाने सहा पैकी पाच जणांना ३ एप्रिल रोजी शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले होते.

दुसऱ्यांदा झालेल्या तपासणीत ‘त्या’ पाचही नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : दिल्ली वरून परत तालुक्यातीत आलेल्या त्या पाच लोकांची पहिली कोरोणा विषाणू संदर्भात तपासणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. आरोग्य विभागाच्या आदेशावरून पुन्हा 8 तारीखला या लोकांची तपासणी करून नमुने तपासणीसाठी पाठविले होते. दुसऱ्यावेळी ही त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने काही प्रमाणात चिंता कमी झाली आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वी तालुक्यातील तीन गावातील प्रत्येकी दोन असे सहा नागरीक दिल्ली येथून या तालुक्यात परतले होते. त्या सहा लोकांची नावे दिल्ली वरून जिल्हा प्रशासनाकडे आली व जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाला सदर लोकांचे बाबत माहिती देताच आरोग्य विभाग पथकाने सहा पैकी पाच जणांना 3 एप्रिल रोजी शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले होते. त्या ठिकाणी त्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते आणि औरंगाबाद येथील विषाणू संशोधक व निदान प्रयोग शाळा सूक्ष्म जिवशास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविल होते. 5 रोजी त्या पाचही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. 

आवश्यक वाचा - शेतकऱ्यांनो सावधान, वादळी पाऊस येतोय

तर सहाव्या रूग्नाला अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव येथील रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले असता तोही पहीला रिपोर्ट निगेटिव्ह आला असून दूसरा रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती तालूका आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे. तसेच दुसऱ्यांदा  त्या पाचही नागरिकांना 8 रोजी शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब नमूने नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानला पाठविण्यात आले असता 10 रोजी त्या पाचही संशयित रुग्णाचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत.

दुसऱ्यांदाही पाचही संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मयूर वाडे यांनी दिली आहे. तालुक्यात सद्यास्थिती एकही रुग्ण कोरोना विषाणू बाधित नाही. तरीसुद्धा येथील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत घरातच राहावे व संचार बंदीचे उल्लंघन करू नये असे  आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.