
कामठी : भिलगाव शिवारातील अंकित पल्प अँड बोर्ड्स प्रायव्हेट लिमिटेड फार्मास्युटिकल कंपनीत १७ जून रोजी घडलेल्या रिऍक्टर नोझल पाईप ब्लास्ट अपघातातील गंभीर जखमी कामगार मंगेश उर्फ मुकेश सुधाकर राऊत (वय ३२, हुडकेश्वर, नागपूर) याचा रविवारी (ता.२२) सकाळी सातच्या सुमारास नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.