इसापूर धरणावरील भूकंपमापक यंत्र १५ वर्षांपासून बंदच, सुरक्षा वाऱ्यावर

earthquake
earthquakee sakal

शेंबाळपिंपरी (जि. यवतमाळ) : भूगर्भातील नैसर्गिक आपत्तीची भिषणता व करावयाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी आवश्यक व महत्त्वपूर्ण असलेले पैनगंगा नदीवरील ईसापूर धरण परिसरातील भूकंपमापक यंत्र (seismometer) मागील 15 वर्षांपासून बंदच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ईसापूर धरण (isapur dam) व परिसराची भूकंपापासून सुरक्षा व आगाऊ माहिती मिळणे, मोजमाप हे सगळे होत नसल्याने मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. (seismometer on isapur dam not working from last 15 years)

earthquake
लेखी आश्वासनानंतरचं अविनाशवर अंत्यसंस्कार; रेस्क्यू टीम दाखल

सन 2006 ला या निर्जनस्थळी असलेल्या भूकंपमापक खोलीची तोडफोड करून त्यातील ग्राफ मशीन व इतर साहित्य चोरट्यांनी पळविले. त्यानंतर अद्ययावत डिजिटल भूकंपमापक यंत्राची उभारणी करण्यासाठी उपकरण विभाग नाशिक यांच्याकडे जलसंपदा विभागाने 19 लाख रूपयांचा भरणाही केला. मात्र, सदर विभागाने वेळीच काम पूर्ण न केल्याने मशीनच्या किमतीतील वाढीमुळे जलसंपदाला आणखी रक्कम भरण्याबाबत सुचविण्यात आले. त्यासाठी विभाग अनुकूल असतानाही नाशिक उपकरणी विभागाने मात्र अद्याप कोणतेही यंत्र न दिल्याने धरण परिसरातील जलसंपदा विभागाने सर्व मार्गदर्शक सुचनांनुसार निर्माण केलेली अद्ययावत रिकामी खोली भूकंपयंत्राची प्रतिक्षा करीत आहे. नुकताच महागाव तालुक्यात केंद्र असलेल्या भूंकप लहरींनी मराठवाड्यातील घरे हलविली. धरणावरील हे बंदावस्थेतील यंत्र चालू असते तर धरणाला होणारे संभावित नुकसान व भुकंपाची तीव्रता याबाबत आकलन झाले असते. मात्र, नवीन यंत्रासाठी पुरेशी रक्कम व पाठपुरावा करूनही नेमके घोडे कुठे अडले, हे समजायला मार्ग नसल्यामुळे ईसापूर धरणाला भूगर्भातील नैसर्गिक उलथापालथ वेळेत सूचना न मिळाल्यामुळे धोक्याची घंटा ठरू शकते. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष व वेळकाढू भूमिका ही लालफितीत अडकलेले यंत्र केव्हा काढणार, हा संशोधनाचाच विषय आहे.

सन 2006 साली ग्राफ यंत्राची चोरट्यांनी तोडफोड केल्यावर संपूर्ण राज्यभर भूकंपमापक यंत्राची उभारणी करण्याची जबाबदारी असलेल्या उपकरणी विभाग नाशिक येथे जलसंपदा विभागाने नवीन यंत्राच्या उभारणीसाठी पुरेशी रक्कम भरली. परंतु, वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप भूकंपमापक यंत्राची उभरणी उपकरणी विभागाने केली नाही. याबाबत वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे.
-हनुमंत धुळगंडे, कार्यकारी अभियंता, इसापूर धरण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com