

Wardha Well Incident
esakal
सेलू (जि. वर्धा) : वडिलांसोबत शेतात गेलेल्या दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा पाणी पिताना विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. २३) दुपारच्या सुमारास सेलू येथे घडली. उन्नती सचिन साटोणे (वय १०) आणि दिव्या सचिन साटोणे (वय ७) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या आणि उन्नती शाळा सुटल्यानंतर वडील सचिन साटोणे यांच्यासोबत शेतात गेल्या होत्या. पाणी पिण्यासाठी त्या विहिरीजवळ गेल्या असता अचानक पाय घसरून दोघीही विहिरीत पडल्या. मुली विहिरीत पडल्याची माहिती मिळताच त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची नोंद सेलू पोलिसांकडून घेण्यात आली आहे.दिव्या आणि उन्नती यांच्या मृत्यूची बातमी समजताच साटोणे कुटुंबाच्या घरी नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांनी धाव घेतली. एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्या बहिणींचा असा अंत झाल्याने साटोणे कुटुंबावर मोठा आघात झाला. संपूर्ण सेलू परिसरात शोकमय वातावरण आहे.
दोन्ही मुली विहिरीत पडल्याचे लक्षात येताच सचिन साटोणे यांनी तातडीने विहिरीत उडी घेत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दम लागल्याने त्यांना बाहेर यावे लागले. त्यानंतर शिवारातील नागरिकांच्या मदतीने दोन्ही मुलींना विहिरीतून बाहेर काढून सेलू ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणीत दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.