Organic Farming
sakal
विदर्भ
Organic Farming: आश्चर्यच! तब्बल बारा फुटांचं टमाटरचं झाड; रसायनांशिवायही निसर्गाचा चमत्कार
Natural Farming: सेलूच्या भगत ले-आऊटमध्ये नैसर्गिकरीत्या बारा फूट उंच झालेलं टमाटर झाड फुलांनी आणि हिरव्या-लाल फळांनी भरलेले दिसत आहे. झाडाची सातत्यपूर्ण संगोपन आणि काळजी घेऊन रासायनिक फवारणीशिवाय फळधारणा साध्य झाली आहे.
सेलू : आजच्या रासायनिक शेतीच्या जमान्यात नैसर्गिक पद्धतीने बहरलेले, बारा फुटांपर्यंत उंच गेलेले टमाटरचे झाड पाहून कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. शहरातील भगत ले-आऊट येथे राहणाऱ्या निर्मला तुमडाम नामक आजींनी त्यांच्या अंगणात नैसर्गिकरित्या उगवलेल्या टमाटरच्या झाडाने अक्षरशः चमत्कारचं घडवला आहे.

