esakal | विलगीकरण कक्षासाठी तंत्रनिकेतन वसतीगृह घेतले ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

corpna buldana.jpg

देशात जसा कोरोना बाहेरून आला, तसा तो या शहरात येऊ नये म्हणून बुधवार (ता.18) पासून बाहेरून आलेल्या प्रत्येकाची स्क्रिनिंग लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात करण्यात येत आहे. यासंदर्भात नागरिकांचे सहकार्य मिळत असून, ते स्वतः आपल्या घरी बाहेरुन आलेल्या व्यक्तीला तपासणीसाठी घेऊन जात आहेत.

विलगीकरण कक्षासाठी तंत्रनिकेतन वसतीगृह घेतले ताब्यात

sakal_logo
By
अविनाश बेलाडकर

मूर्तिजापूर (जि. अकोला) : शहरात आतापर्यंत बाहेरून येणाऱ्या 500 नागरिकांची स्क्रिनिंग (तपासणी) करण्यात आली असून, एकही संशयित सुद्धा आढळला नाही. मात्र, प्रतिबंधात्मक तरतूद म्हणून शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतीगृहातील 90 खोल्या विलगीकरण कक्षासाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- सोसायट्या, सदनिकांचे, लॉकडाउन, घर कामगार, मोलकरीनेच्या सेवा बंद

वार्डनिहाय कर्मचाऱ्यांची नेमणूक
देशात जसा कोरोना बाहेरून आला, तसा तो या शहरात येऊ नये म्हणून बुधवार (ता.18) पासून बाहेरून आलेल्या प्रत्येकाची स्क्रिनिंग लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात करण्यात येत आहे. यासंदर्भात नागरिकांचे सहकार्य मिळत असून, ते स्वतः आपल्या घरी बाहेरुन आलेल्या व्यक्तीला तपासणीसाठी घेऊन जात आहेत. नगर पालिका प्रशासनाने शहरातील वॉर्डनिहाय 17 कर्मचाऱ्यांची नेमणूक करून संबंधित नगरसेवकांना पूर्वकल्पना देऊन शहरात बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सदर कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

क्लिक करा- बच्चू कडूंनच्या निर्देशानुसार धान्य वाटपासाठी समिती

भविष्यातील संभाव्य स्थितीचा धोका
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष ऊभारण्यात आला आहे. भविष्यातील संभाव्य स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अपवादात्मक परिस्थितीत विलगीकरण कक्ष म्हणून वापर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील येथून पाच किमी अंतरवरील शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतीगृहाच्या 90 खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालयांना सुट्या देण्यात आल्यामुळे सदर अद्ययावत वसतीगृह रीक्त आहे.

भारतात कोरोनाचे निर्मुलन शक्य आहे
500 लोकांचे ओपीडीत चौकौनात उभे करून सर्व प्रकारची सावधगिरी बाळगून स्क्रिनिंग झाले. त्यापैकी आठ नागरिकांना आकोल्याला पाठाविले. ते निगेटीव्ह निघाले, त्यांना क्वांरटाईन करण्यात आले. विलगीकरणाला पर्याय नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही भारत कोरोनाविरोधी लढा प्रभावीरित्या देत असल्याचा निर्वाळा दिला आहे. भारतात कोरोनाचे निर्मुलन शक्य आहे.
-डॉ. राजेंद्र नेमाडे, वैद्यकीय अधीक्षक, लदेसा उपजिल्हा रूग्णालय, मूर्तिजापूर

दोन दिवसात संपूर्ण शहराचे सॕनिटायझेशन केले
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन दिवसात संपूर्ण शहराचे सॕनिटायझेशन केले. बाहेरगावाहून शहरात आलेल्यांचे वॉर्डनिहाय कर्मचारी नियुक्त करून सर्वेक्षण सुरू केले आहे.
-विजय लोहकरे, मुख्याधिकारी, न.प.मूर्तिजापूर

प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला
उपजिल्हाधिकारी अभयसिह मोहिते यांनी स्वतः निरिक्षण करून भविष्यातील अपवादात्मक परिस्थितीत विलगीकरण कक्ष म्हणून वापर करण्यासाठी येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील वसतीगृह ताब्यात घेतले आहे. तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.
-प्रदीप पवार, तहसीलदार, मूर्तिजापूर 

loading image
go to top