
अमरावती :ऑनलाइन कामकाज सुरू झाल्यापासून कॅम्प उपडाकघरात सर्व्हरमध्ये येणाऱ्या अडचणी दूर झाल्या नाही. बीएसएनएलसह संबंधित कंपनीकडे तांत्रिक बिघाड दूर करण्याची जबाबदारी आहे, असे प्रवर डाक अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सर्व्हरमधील बिघाड दूर न झाल्यामुळे शुक्रवारी (ता. 26) दुपारपर्यंत आर्थिक व्यवहाराच्या खिडक्यांपुढे सर्व्हर डाउनच्या पाट्या कायम होत्या.
पावसाळ्याच्या दिवसांत वातावरणात बदल झाले की, सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होतातच, असा दावा करणाऱ्या प्रवर डाक अधीक्षक कार्यालयाने कॅम्प उपडाकघरातील सर्व्हरमध्ये अडचणी या आठवड्यापासून सुरूच असल्याची बाब अखेर मान्य केली. त्यासाठी प्रवर डाक अधीक्षक कार्यालयाकडे कॅम्प उपडाकघराच्या अधिकाऱ्यांनी तक्रार केली असता, दुसऱ्या दिवशी प्रवर डाक अधीक्षक कार्यालयातील तांत्रिक विभाग सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांने सर्व्हरची सेवा देणाऱ्या कंपनीच्या नागपूर कार्यालयाशी संपर्क साधला, परंतु त्यांनाही अमरावती कॅम्प डाकघरातील सर्व्हरच्या अडचणी तेथून निर्माण झाल्या नसल्याचे सांगितल्या गेले.
त्यानंतर मुंबई येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, सर्व्हरच्या राऊटरमध्ये जो पंखा असतो, त्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे सांगितल्या गेले. दुरुस्तीसाठी थोडा विलंब लागू शकतो. असे प्रवर डाक अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सर्व्हरशी संबंधित सेवा पुरविणारी खासगी कंपनी आहे. ती कंपनी बीएसएनच्या लाइनचा वापर करते. त्यामुळे आता तांत्रिक दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही बीएसएनएलसह संबंधित कंपनीवर ढकलण्यात आली.
आणखी वाचा - अमरावतीत सुरू आहे रेशनच्या तांदळाचा काळाबाजार
तात्पुरती मशीनरी दिली
आठवड्यापासून कॅम्प डाकघरात सर्व्हर डाउनमध्ये ग्राहकांना त्रास होत असल्याचे कळल्यावर अखेर शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रवर डाक अधीक्षक कार्यालयात उपलब्ध असलेली तात्पुरती मशनरी येथे देण्यात आली. परंतु त्यातूनही पूर्ण काम होत नाही.
बीएसएनएल आणि सर्व्हर पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत वरिष्ठ स्तरावरून चर्चा सुरू आहे. लवकरच त्यासंदर्भात तोडगा निघेल.
ऐसला नरेश, प्रवर डाक अधीक्षक, अमरावती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.