Wardha: पाईपला कवटाळून तो १८ तास होता विहिरीत, एनसीसीच्या जवानांनी सेवाग्राममध्ये अर्ध्या तासात केले बचावकार्य यशस्वी

NCC Team Rescues Farmer Trapped in Well: सेवाग्राममध्ये विहिरीत पडून १८ तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या शेतमजुराला एनसीसीच्या जवानांनी अवघ्या ३० मिनिटांत सुखरूप बाहेर काढत जीवनदान दिले.
Wardha

Wardha

esakal

Updated on

सेवाग्राम: मुसळधार पावसात विहिरीत पडून तब्बल १८ तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या शेतमजुराला ३ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या आर्मी एनसीसी अधिकारी व जवानांनी वेळेत मदतीचा हात देत जीवनदान दिले. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण, प्रसंगावधान आणि तातडीची कृती यामुळे ही बचावमोहीम यशस्वी ठरली. बापूरावजी देशमुख फाउंडेशनच्या वसतीगृह परिसरामागील शेतातील विहिरीत शेतमजूर जीवन ताकसांडे (वय ५५) पाय घसरून शुक्रवारी (ता.३) सायंकाळी सहा वाजता पडले. यावेळी परिसरात मुसळधार पाऊस असल्याने त्यांच्या मदतीचा आवाज कोणालाही ऐकू आला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com