Coronavirus : सात जण कोविड कक्षात; 159 लोकांना घरीच विलगीकरण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रयत्न केले जात आहेत. २४ मे राेजी तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे सर्वेक्षण करण्यात आले.

अकोला : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे सर्वेक्षण करण्यात आले. तीव्र जाेखमीच्या सात ग्रामस्थांना कोविड विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, १५९ लोकांना घरीच विलगीकरण (हाेम क्वारंटाईन) करण्यात आले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रयत्न केले जात आहेत. २४ मे राेजी तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षण डाॅ. सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.अकोला व जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले स्वतः व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

महत्त्वाची बातमी - COVID19 : कसा होतो कोरोनाच्या स्वॅबचा लॅबपर्यंत प्रवास?; कशी होते बाधित असल्याची खात्री?...वाचा

सर्वेक्षणात ११ पथकांचा सहभाग
बेलखेड येथे सर्वेक्षणासाठी एकूण ११ पथके तयार करण्यात आली हाेती. एकूण ३६१ घरांना भेटी देवून १ हजार ६१७ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी, सुरेश असोले, तालुका आरोग्य अधिकारी, तेल्हारा येथील डाॅ.प्रवीण चव्हाण, प्रामुख्याने हजर होते. प्रा.आ.केंद्र हिवरखेड येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ.नंदकिशोर चव्हाण, साथरोग अधिकारी डाॅ.सुनील मानकर, वैद्यकीय अधिकारी आदित्य महानकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रकाश गवळी उपस्थित हाेते.

परिसरात केली फवारणी
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या परिसरात फवारणी करण्यात आली. तसेच बाहेरगावावरुन सर्वाची आरोग्य तपासणी करण्याबाबत आणि त्यांच्या नातेवाईकांनी स्वतःहून तपासणी करून रेफर, घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या, असे जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी जिल्हा प्रकाश गवळी यांनी कळविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven villagers were kept in the covid isolation room in akola