

Adola Project at 11% Capacity, Risod City Hit by Water Shortage
sakal
वाशीम : उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अत्यंत गडद झाले आहे. जिल्ह्यातील विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठल्याने ग्रामीण तसेच शहरी भागात पाण्यासाठी नागरिकांची प्रचंड वणवण सुरू आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्ह्यातील ६९ हून अधिक गावांमध्ये अधिकृतपणे पाणीटंचाई जाहीर केली असून, या गावांमधून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी तीव्र झाली आहे.