शहरातील देहव्यापार झाला "हायटेक'

Sex business in the city is High tech
Sex business in the city is High tech
Updated on: 

नागपूर- शहरातील लॉज, फार्महाऊस, ब्युटी पार्लर, मसाज सेंटर अँड स्पा आणि लेडिज जिममध्ये सुरू असलेला देहव्यापार आज "हायटेक- झाला आहे. ब्युटी पार्लरमधील देहव्यापाराची "रिक्‍स' पाहता अनेक महिला दलालांनी आंबट शौकीनांना जाळ्यात ओढण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. वॉट्‌सऍपवरून मुलींचे अर्धनग्न फोटो पाठवून रेटकार्ड पाठवून देहव्यापाराचा नवा फंडा सुरू केला आहे.

शहरातील ब्युटी पार्लर, हॉटेल्स आणि लॉजवर गुन्हे शाखा पोलिसांची नजर असल्यामुळे अनेक महिला दलालांनी आंबटशौकीन ग्राहकांना रिझविण्यासाठी वॉट्‌सऍप आणि फेसबूकचा वापर करणे सुरू केले आहे. महिला दलाल स्वतःच्या वॉट्‌सऍपवरून उपलब्ध असलेल्या तरूणींचे अर्धनग्न फोटो आणि त्यांचा रेट ग्राहकांना पाठवित आहेत. वॉट्‌सऍपवरूनच ग्राहक मुलींची निवड करतो आणि महिला दलालांशी सौदा करतो. मॅसेजच्या स्वरूपात तडजोडी केल्या जातात. सौदा पक्‍का होताच तरूणीचा थेट मोबाईल क्रमांक ग्राहकांना देण्यात येत आहे.

ग्राहकांच्या मागणीनुसार व्हिडीओ कॉलद्वारे तरूणींची निवड करण्याचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये ब्युटी पार्लर किंवा "मसाज अँड स्पा'मधील तरूणी वॉट्‌स ऍप व्हिडीओच्या माध्यमातून अंगप्रदर्शन करते. त्यानुसार तरूणींचा रेट लावण्यात येतो. अल्पवयीन मुलींना जोरात मागणी असून सेक्‍स रॅकेट चालविणाऱ्या महिला दलाल ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केल्यानंतरच अल्पवयीन मुलींचा सौदा करीत आहेत.

साधारणतः 12 ते 16 वर्षे वयोगटातील मुलींचा पाच हजार ते 20 हजार रूपयांत महिला दलाल सौदा करीत आहेत. त्यांची 15 ते 20 सेकंदाची व्हिडियो क्‍लिप हवी असल्यास आधी पैसे टाकावे भरण्याच्या सूचना केल्या जातात. पैस न भरल्यास लगेच "ब्लॉक' करण्यात येते. 

पेटीएम-भीम ऍपने स्विकारतात पैसे 
देहव्यापार एवढा हायटेक झाला की दलाल थेट पेटीएम किंवा भीम ऍपने पैसे ट्रान्सफर करण्यास सांगतात. तरूणीचा फोटो आणि तिचा मोबाईल क्रमांकांसह पेटीएम,\ बारकोडही पाठवितात. पेटीएमने पैसे ट्रान्सफर झाल्यानंतरच तरूणीचा पत्ता देण्यात येते. नागपूर पोलिसांच्या खाऊ वृत्तीमुळे पूर्वी तुरळक असलेला देहव्यापार आता जवळपास अर्ध्या शहरात पसरला आहे.

दलाल-पोलिसांत "दोस्ती' 
अनेक ठाणेदारांच्या परवानगीने पोलिस स्टेशनच्या हद्‌दीत सेक्‍स रॅकेट सुरू आहेत. देहव्यापार सुरू करण्यासाठी महिला दलालाला एसएसबीकडे पाठविण्यात येते. तेथून परवानगी मिळाल्यानंतर ठाणेदाराशी "अर्थपूर्ण' चर्चा केल्या जाते. महिन्याच्या दोन तारखेला महिला दलाल आणि विशेष पोलिस कर्मचाऱ्यांच्या भेटी ठरलेल्या असतात, अशी माहिती एका पोलिस कर्मचाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Open drains and stagnant wastewater raise sanitation concerns at Gadchiroli District General Hospital.
Gurudev Seva Mandal Clarification
Devotees gather at Gurukunj Mozari during the 58th death anniversary event of Rashtrasant Tukdoji Maharaj.
Sant Tukdoji Maharaj