मेडिकल चौकातील "सेक्‍स रॅकेट'वर छापा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 August 2019

नागपूर ः नागपुरातील तरुणींना कमी वेळात जास्त पैसे कमाईचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेणाऱ्या दोन दलालांना गुन्हे शाखेच्या एसएसबी विभागाने छापा घालून अटक केली. देहव्यापाराच्या दलदलीत अडकलेल्या तीन तरुणींची पोलिसांनी सुटका केली. फिरोज खान तुर्रेबाज खान (47, श्रावणनगर, वाठोडा ले-आउट) आणि शैलेश मच्छिंदर झामरे (वय 33, रा. म्हाडगीनगर, हुडकेश्‍वर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश झामरे हा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन सेक्‍स रॅकेट चालवीत होता. व्हॉट्‌सऍपवर आंबटशौकीन ग्राहकांशी संपर्क करून देहव्यापारासाठी तरुणींना पोहोचवून देत होता. या कामात त्याला फिरोज खान हा मदत करीत होता. पीडित तरुणींना वेगवेगळ्या ठिकाणी ग्राहकांना पुरवून देहव्यापार करवून घेतला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोन बनावट ग्राहक तयार केले. त्यांच्यामार्फत आरोपी शैलेश झामरे याच्याशी मोबाईलवर संपर्क करण्यास सांगितले. बनावट ग्राहकाने शैलेशशी मोबाईलवर बोलणी केली. त्यानंतर आरोपी शैलेशने दहीपुरा वस्ती, उंटखाना रोड, मेडिकल चौक ते अशोक चौक मार्गाच्या बाजूला मुलींना घेऊन येत असल्याचे ग्राहकांना सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला. आरोपी झामरे घटनास्थळावर येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी धाड घालून झामरेसह त्याचा साथीदार फिरोज खान याच्या मुसक्‍या आवळल्या. तर तीन पीडित मुलींची या दलदलीतून सुटका केली. ही कारवाई वपोनि उमेश बेसरकर, पोउपनि स्मिता सोनवणे, दामोदर राजूरकर, अजय जाधव, पोलिस हवालदार शीतलाप्रसाद मिश्रा, पोशि प्रल्हाद डोळे, पोशि सुरेखा सांडेकर, छाया राऊत, साधना चव्हाण, चालक पोहवा अनिल दुबे, पोशि योगेश इप्पर तसेच सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा पाटील, सुनीता ठाकरे यांनी पार पाडली आहे.
तरुणींचे व्हॉट्‌सऍपवर अश्‍लील फोटो
झामरेकडे 10 ते 15 तरुणी देहव्यापारासाठी तयार होत्या. तो ग्राहकांना व्हॉट्‌सऍपवर वेगवेगळ्या मुलींचे अश्‍लील फोटो पाठवून मुलीची निवड करण्यास सांगतो. निवड केलेल्या मुलींना तो आंबटशौकीन ग्राहकाला मेडिकल चौकात आणून देतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तो तरुणींचे अश्‍लील फोटोशूट करीत असल्याची माहिती आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sex racket" in medical square