अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; झालेल्या बाळाला दिले दत्तक

सेवाग्राम येथे एका अल्पयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. यातून तिला गर्भधारणा झाली. लग्नाच्या प्रतीक्षेत या मुलीने एका बाळाला जन्म दिला.
Crime
CrimeSakal

वर्धा - सेवाग्राम येथे एका अल्पयीन मुलीवर (Minor Girl) लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) करण्यात आला. यातून तिला गर्भधारणा झाली. लग्नाच्या प्रतीक्षेत या मुलीने एका बाळाला (Born Baby) जन्म दिला. एवढेच नाही तर या बाळाला अनधिकृतपणे दत्तक (Adopt) देण्याचा प्रकारही झाला. याची माहिती महिला बालकल्याण विभागाला मिळताच त्यांनी या प्रकरणी पोलिस विभागात तक्रार देत यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिस तक्रारीनुसार, सेवाग्राम परिसरातील एका १७ वर्षीय मुलीवर दोन वर्षांपूर्वी लैंगिक अत्याचार झाला. याची माहिती मुलीच्या आईने बालसंरक्षण विभागाला दिली. एवढेच नाही तर त्यांनी यातून जन्माला आलेले बाळ कोणतीही कायदेशीर कारवाई न करता दत्तक दिल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. हे दोन्ही प्रकार गैरकादेशीर असल्याचे कळताच महिला बालकल्याण विभागाने पोलिसांना याची माहिती दिली.

Crime
खासदार सुप्रिया सुळे यांना आवडली वर्ध्याची पुरणपोळी

बालसंरक्षण विभागाकडून या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस विभागाकडून पत्रानुसार चौकशी करण्यात आली. यात संबंधित प्रकारात सत्यता असल्याचे दिसून आले आहे. त्याचा अहवाल बाल कल्याण समितीस सादर करण्यात आला. यावरून दोन्ही प्रकार गैरकायदेशीर असल्याने यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बाल कल्याण समितीकडून करण्यात आली आहे.

मुलींच्या पालकांसह दत्तक घेणाऱ्यांनी दिली माहिती

या प्रकरणात बाळाला दत्तक घेणाऱ्या पालकांसह त्या मुलीच्या आईवडिलांनी या प्रकाराची माहिती बालसंरक्षण विभागाला दिली. यावरून समितीने चौकशी करून या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. नागरिकांनी अशा प्रकारात सजग राहुन तक्रार करावी असे आवाहन बालसंरक्षण विभागाच्या अधिकारी माधुरी भोयर यांनी केले आहे.

लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक

या प्रकरणात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव किसन ऊर्फ अक्षय गुजरकर असे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com