

Buldhana
esakal
देऊळगाव राजा: जम्मू-काश्मीरमध्ये देशसेवा बजावताना वीरमरण आलेले भारतीय सैन्याच्या ३३ रेजिमेंटमधील हवालदार अंकुश महादेव मिसाळ हे मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देत सोमवारी (ता.२९) अनंतात विलीन झाले. दुपारी त्यांच्या मूळ गावी मेहुणाराजा येथे शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.