प्रतापगड पहाडीवरील शंकराची मूर्ती जळाली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : ऐतिहासिक प्रतापगड पहाडावरील भगवान शंकराची विशाल मूर्ती जळाल्याची घटना शुक्रवारी (ता.26) सकाळी निदर्शनास आली.

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : ऐतिहासिक प्रतापगड पहाडावरील भगवान शंकराची विशाल मूर्ती जळाल्याची घटना शुक्रवारी (ता.26) सकाळी निदर्शनास आली.
नवेगावबांध परिसरात दौऱ्यावर असलेले आमदार राजकुमार बडोले यांना या घटनेची माहिती प्रतापगडचे भोजराज लोगडे यांनी दिली. बडोले यांनी लगेच जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. यामुळे शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. तहसीलदारांसह केशोरी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. उल्लेखनीय म्हणजे, गुरुवारी (ता. 25) विजांच्या कडकडाटासह परिसरात पाऊस झाला. वीज पडून मूर्ती जळाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही मूर्ती प्लॉस्टर ऑफ पॅरिसची असून 2005 च्या सुमारास तत्कालीन आमदार नाना पटोले यांनी या मूर्तीची स्थापना केली होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shankara idol burnt on Pratapgarh hill