शरद पवार म्हणाले, देश एकसंघ ठेवण्यासाठी दंगलखोरांकडे सत्ता नको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

‘दंगली घडविणाऱ्यांच्या हाती सत्तेची सूत्रे जाता काम नये’

मूल (जि. चंद्रपूर) : त्रिपुरामध्ये घडलेली दंगल अमरावतीमध्ये पेटण्याची कारण काय होते? याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. धर्म, जाती, भाषा यावरून समाजात फूट पडू नये. मात्र, काही विघातक शक्ती फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. देश एकसंघ ठेवायचा असेल तर दंगली घडविणाऱ्या लोकांच्या हातात सत्तेची सूत्रे जाता काम नये. त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सजग राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे (ग्रामीण) मूल येथील क्रीडा संकुलात गुरुवारी (ता. १८) आयोजित मेळाव्यात शरद पवार बोलत होते. डिझेल आणि पेट्रोलच्या वाढलेल्या किमतीमुळे सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना मोठी झळ पोहोचली आहे. ओबीसीची घटलेली टक्केवारीसुद्धा पूर्ववत आणण्यासाठी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: ‘दंगल पूर्वनियोजित कशी हे सिद्ध करा अन्यथा तुमचाही कुठेतरी हात’

राज्यात होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष महिलांसाठी ५० टक्के राखीव जागा देणार आहे. काही नेते सोडून गेले. त्यांची चिंता करू नका. मा. सा. कन्नमवारांचा जिल्हा राष्ट्रवादीचा होईल, असा आशावाद शरद पवार यांनी व्यक्त केला. अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल्ल पटेल होते. याप्रसंगी संपर्क आणि ऊर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, सुबोध मोहिते, मधुकर कुकडे, मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राजेंद्र जैन, अशोक जीवतोडे, शोभाताई पोटदुखे यांची उपस्थिती होती.

loading image
go to top