
गोंडपिपरी(जि. चंद्रपूर) : तोंडावर रूमाल,हातात सायकलचे हँन्डल अनं कॅरिअरवर भाजीपाला भरलेला कॅरेट.घेता का हो ढेणसं; काकडी म्हणत सायकलचे पायडल मारीत निघायचे अनं गि-हाईक भेटले की सोशल डिस्टन्स ठेवत भाजीपाला विकायचा अनं समोर जायचे. दिवसभर सायकलने बावीस किलोमीटरचा प्रवास करायचा अन मिळालेल्या रोजीतून घरच्यांना आधार द्यायचा. चेकलिखीतवाडयातील एका महिलेचा जिवन जगण्याकरिताचा सायकलचा हा प्रवास मार्गावरील अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
कोरोनाने सा-यांनाच हादरवून सोडलय,सामान्य स्थिती अतिशय बिकट झाली. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी शासनाने 21 दिवसाचा लॉकडाऊन केला. या लॉकडाउनने गरीब माणसाचे कंबरडे मोडले.अनेक जणांना दोन वेळचा जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. कोरानाच्या वादळात अनेक दुर्देवी कहाण्यांनी समाजमन अक्षरश: हळहळलय. पण या संकटकाळातही अनेक जण न डगमगता आपल्यांचे पोट भरण्यासाठी कष्ट करताहेत.चार्माेशी तालुक्यातील मनीषा अंबादास वाकुडकर या महिलेची संघर्षाची कहाणी.
मुळची गोंडपिपरी तालुक्यातील चेकलिखीतवाडा येथील मनीषा वाकुडकर यांचा विवाह चार्मोशी तालुक्यातील मचली येथील अंबादास वाकुडकर यांच्याशी झाला.दरवर्षी हे दाम्पत्य चेकलिखीतवाडा येथे येते. तेथील गावालगत असलेल्या उमा नदीपात्रात ढेणसे काकडया व टरबुजचे उत्पन्न घेतात. मागील वर्षी सिझन काही खास गेला नाही. यामुळे यंदा ते नव्या उमेदीने कामाला लागले.नदीत उत्पन्न घ्यायच अनं नदीच्या काठावरील मुख्य मार्गावर बसून वस्तू विकायच्या.पण यंदा कोरोना आले अन होत्याचे नव्हते झाले.गावच्या गाव लॉकडाऊन झाली. रस्त्यावरही शुकशुकाट आहे.अशात आपले काय होईल याची चिंता या दाम्पत्यांना सतावू लागली. अशावेळी मनीषा समोर आली.पती अंबादास नदीत आपल्या पिकांची काळजी घेण्यासोबत रक्षण करतो तर पत्नी सायकलवर भाजीपाला घेउन गावोगावी विकते
चेकलिखीतवाडयावरून सायकलच्या कॅरिअरवर शेतमाल सोबत घ्यायचा.तोडांवर रूमाल,अन सायकलचे पायडल मारीत प्रवास करायचा.आज ती आपला शेतमाल विकत विकत बावीस किलोमीटर अंतरावरील नांदगावात गेली. रोजीरोटीसाठी महिलेची ही धावपळ सामाजिक कार्यकर्ते दशरथ वाकूडकर यांनी बघितली.अन तेही स्तब्धच झाले.कोरोनाच्या या संकटकाळात एकीकडे धनाढय आपआपल्या घरात चैनीत बसले असतांना रोजीरोटी करणा-यांनी अदयापही हिंमत हारली नाही.शेवटी सवाल पोटाचा आहे ना......!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.