

Buldhana News
esakal
शेगाव: जून महिन्यात मान्सूनचे आगमन होणार असून शेतकरी सध्या खरीप हंगामाची पूर्व तयारी करत आहे. मात्र जिल्ह्यात अनेक भागात डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच इंधनाअभावी ट्रॅक्टर उभे राहिल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे (नांगरणी, वखरणी) ठप्प झाली आहेत. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.