Shegaon Gajanan Maharaj Sansthan
esakal
राज्यात यावर्षी 'अल निनो'च्या प्रभावामुळे पावसाने मोठी ओढ दिली असून संपूर्ण महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक संकटामुळे राज्यातील बळीराजा म्हणजेच शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत सापडला आहे. अशा कठीण परिस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शेगांव येथील सुप्रसिद्ध श्री गजानन महाराज संस्थान नेहमीप्रमाणे पुढे आले आहे. संस्थानच्या वतीने 'मुख्यमंत्री सहायता निधीस' १ कोटी ११ लाख रुपयांचा भरीव सहयोग निधी सुपूर्द करण्यात आला आहे.