Gajanan Maharaj Temple Crowd
esakal
शेगाव (अकोला) : नवीन वर्षारंभी अडीच लाखांहून अधिक भाविकांनी श्रींचे समाधी दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरवात श्रींच्या (Shegaon Shri Gajanan Maharaj) कृपा आशीर्वादाने केली आहे. तर ३१ डिसेंबर एकादशी व १ जानेवारी गुरुवार या दोन्ही दिवसांत एक लाखांवर भाविकांनी श्रींच्या महाप्रसादाचा लाभ घेतला.
गेल्या काही वर्षातील आकडेवारी बघता नवीन वर्षाच्या प्रारंभी होणारी गर्दी यंदा सर्वाधिक असल्याचे चित्र संतनगरीमध्ये पाहायला मिळाले. यामुळे शहरातील लहान मोठ्या व्यावसायिकांची चांगलीच उलाढाल झाली आहे.