Shegaon Palkhi sakal
विदर्भ
Shegaon Palkhi : शेगावीचा राणा निघणार उद्या पंढरीच्या वारीला; श्रींच्या पालखीचे सातशे वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान
Pandharpur Wari : शेगाव येथून संत गजानन महाराजांची ५६ वी पालखी वारी २ जून रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने पायदळ प्रस्थान करणार आहे. टाळ-मृदंगांच्या गजरात हजारो वारकरी भावपूर्ण वातावरणात सहभागी होणार आहेत.
शेगाव : सालाबादाप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर वारीसाठी शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराज यांची पालखी उद्या सोमवार (ता.२) जून रोजी सकाळी ७ वाजता मंदिरामधून वारकऱ्यांसह भजनी दिंडीने पायदळ प्रस्थान करणार आहे. श्रींचे दर्शनासाठी यावेळी भाविक भक्त मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करणार आहे. यंदा श्रींच्या पालखी वारीचे हे ५६ वे वर्ष आहे.