Faith, Devotion and Service
esakal
शेगावचे आराध्य दैवत श्री संत गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रगटदिन उत्सवाला श्री गजानन महाराज संस्थानमध्ये सोमवार, २ फेब्रुवारी रोजी श्री महारुद्रस्वाहाकार यागाने प्रारंभ झाला आहे. सप्ताहभर चालणाऱ्या या उत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरात भजन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसर रंगरंगोटी करून आकर्षकपणे सजविण्यात आला असून, सर्वत्र फुलांच्या माळा, आंब्याच्या पानांची तोरणे व केळीचे खांब लावून सुशोभीकरण करण्यात आले आहे.