Shegaon Alert : दिल्ली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शेगावच्या श्री संस्थानमध्ये सुरक्षा वाढवली!

Gajanan Maharaj Temple : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटक हल्ल्यानंतर गृह विभागाने देशभरात हाय अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार खबरदारी म्हणून शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
Security tightened at Shegaon’s Shri Gajanan Maharaj Temple

Security tightened at Shegaon’s Shri Gajanan Maharaj Temple

sakal

Updated on

शेगाव : जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचना चे अनुषंगाने पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.मंदिरामध्ये बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची तसेच संशयित व्यक्तीची मंदिराचे प्रवेशद्वारात पोलिसांकडून तपासणी केली जात असून त्यानंतर भक्तांना दर्शनास आत सोडण्यात येत आहे.मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आहे.श्रींचे मंदिराची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात आहे.नेहमी प्रमाणे श्री संस्थानचे सुरक्षा रक्षक सदैव भक्तांचे सुरक्षे साठी कार्यरत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com