हृदय विकारला बनविली ताकत; अन् वेटलिफ्टिंगमध्ये मिळविले नावलौकीक!

महादेव घुगे
Monday, 20 January 2020

वाशीम येथे पार पडलेल्या ‘नॅशनल वेटलिफ्टींग चॅम्पियनशिम 2019’ मध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये सुमारे 13 राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. मात्र, अंतीम तिघांमधून कौसरने भरारी घेत प्रथम क्रमांक मिळविला.

रिसोड (जि.वाशीम)  : ‘गरज ही शोधाची जनणी आहे’, ‘शोधा म्हणजेच सापडेल’ असे म्हटले जाते. वयाच्या ऐन उमेदीतच शेख कौसर या युवकाला हृदय विकाराचा झटका आला. त्यामुळे औरंगाबाद येथे उपचार घ्यावे लागले. डॉक्‍टरांनी दररोज सकाळी व्यायाम करताना वजनदार वस्तू उचलण्याचा सल्ला दिला आणि कौसरने हाच कित्ता गिरवणे सुरू ठेवत थेट विदेशात होणाऱ्या भारत्तोलन स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

रिसोड तालुक्‍यातील सवड येथील शेख कौसर शेख फत्तु (वय 44) यांचे शिक्षण बारावी पर्यंत झाले. त्यामुळे नंतर दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह असताना, ऐन उमेदित या युवकास वयाच्या 44 वर्षी हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे औरंगाबाद येथे उपचार घेतला. उपचारापश्‍चात डॉक्‍टरांनी नियमीत व्यायाम, वजनदार वस्तू उचलण्याचा सल्ला दिला. 

हेही वाचा - पतंग उडविण्याचा नाद बेतला चिमुकल्याच्या जीवावर

थ्रेशरची चाके उचलण्याचा केला सराव
कौसरने घरीच कधी पिठाच्या गिरणीचे जाते, तर कधी थ्रेशरची चाके उचलण्याचा सराव केला. यातूनच कौसरचा मोठा सराव झाला आणि वाशीम येथे पार पडलेल्या ‘नॅशनल वेटलिफ्टींग चॅम्पियनशिम 2019’ मध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये सुमारे 13 राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. मात्र, अंतीम तिघांमधून कौसरने भरारी घेत प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे उत्तप्रदेश, पंजाब येथील खेळाडूंना दोन व तीन नंबरवर मागे टाकत स्पर्धेत बाजी मारली. 

क्लिक करा - समृद्धीचे स्वप्न पाहणाऱ्या पिढीची निर्मिती अत्यावश्यक

2017 मध्ये पटकाविले सुवर्ण पदक
या पूर्वीही 2017 मध्ये नागपूर येथे राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले आहे. आता भारत्तोलन स्पर्धेत कौसरच्या या यशामुळे त्याच्या विदेशातील स्पर्धेचा मार्ग सुकर झाला आहे. या खेळाडूने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मुल, अनिल खांदळे, प्रा. दवंडे, प्रा. रविंद्र अंभोरे यांना दिले.

होतकरूंनी पुढाकार घेण्याची गरज
ग्रामीण भागातील अनेक युवकांमध्ये विविध कलागुण आहेत. परंतु, त्यांच्यातील हे कौशल्य ओळखल्या जात नाही. याकरिता त्यांना सहकार्याची नितांत गरज आहे. याकरिता समाजातील प्रत्येक होतकरूंनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
-शेख कौसर, भारत्तोलन स्पर्धक, रा. सवड ता. रिसोड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shekh kausar qualify in weightlifting competition