esakal | चराई पासेसकरिता मेंढपाळ बांधवांची धडक
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

चराई पासेसकरिता मेंढपाळ बांधवांची धडक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : चराई पासेससह इतर मागण्यांसाठी मेंढपाळ बांधवांनी मंगळवारी (ता.3) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. चराई पासेसच्या मुख्य मागणीसाठी जिल्हाकचेरीवर उपोषण सुरू करण्यात आले.
मेंढपाळ हा उपजिविकेचा व्यवसाय असून वनविभागाकडे चराईकरिता पासेसची मागणी करण्यात येत आहे. मात्र अनेकदा आंदोलने तसेच निवेदने देवूनसुद्धा या ंमागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र वनविभागाकडून आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतात, असा मेंढपाळ बांधवांचा आरोप आहे. चराई पासेस त्वरित देण्यात याव्या, वनविभागाकडून होणारी दंडवसूली थांबविण्यात यावी, जप्त केलेल्या जनावरांचा हर्रास करू नये, मेंढपाळांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत, आदी मागण्यांसाठी 13 कार्यकर्त्यांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले. उपोषणकर्त्यांमध्ये भीमराव महानर, अर्जुन महानर, योगेश करंडे, सुनील महानर, विशाल पिसाळ, रोशन शिंगाडे, देवराव यमगर, समाधान सूळ, अशोक पिसाळ, प्रकाश गोफणे, हरिदास पिसाळ, राजू घुले, प्रकाश पिसाळ आदींचा समावेश आहे.

loading image
go to top