
चेतन देशमुख
यवतमाळ : पक्षसंघटन वाढविण्याच्या दृष्टीने पश्चिम विदर्भावर शिवसेना शिंदे पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर ‘फोकस’ ठेवण्यात आला आहे. यासाठी ‘मिशन टायगर’ सुरू असून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचेवर जबाबदारी देण्यात आली असून यवतमाळ जिल्हातून यांची सुरवात झाली आहे.