
अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नागपूर येथील प्रशांत कोरटकर यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा, या मागणीसाठी सोमवारी (ता. तीन) अमरावतीत शिवसन्मान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.