यवतमाळ - खासदार संजय देशमुख यांनी केलेल्या कथित बंडाळीच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. दोन पंजा चौकात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. .आंदोलनात वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर, संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे व जिल्हाप्रमुख किशोर इंगळे यांच्या नेतृत्वात खासदार संजय देशमुख यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध नोंदविला..यावेळी संपूर्ण परिसर 'गद्दारांचा निषेध असो', 'संजय देशमुख मुर्दाबाद' अशा घोषणांनी दणाणून गेला. शिवसैनिकांच्या गर्दीमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.नेत्यांनी आपल्या भाषणातून खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत शिवसेनेच्या विचारांशी व पक्षप्रमुखांच्या विश्वासाशी केलेली प्रतारणा कदापि सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला. शिवसैनिकांच्या भावनांशी खेळणाऱ्या नेत्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला..आंदोलनादरम्यान संतप्त शिवसैनिकांनी खासदार देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाहीत, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.या आंदोलनामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात ठाकरे गटाकडून आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचे संकेतही यावेळी देण्यात आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.