Loksabha 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहिरात वाचतानाही लाज वाटते: उद्धव

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

यवतमाळ : काँग्रेस-राष्ट्रवादी जाहिराती करुन लाज नाही का वाटत? विचारताय, मला त्या जाहिराती वाचतानाही लाज वाटत असल्याची टीका आघाडीवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली.

यवतमाळमध्ये भाजप-सेना युतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ पोस्टल ग्राउंडवर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाच्या फुग्याला खूप भोक पडले आहे. त्यामुळे आता हा फुगा फुगणार नाही. तुम्ही ५६ काय १५६ पक्ष जरी एकत्र आलात तरी भगवा फडक़णारच त्यामुळे युती सरकारच सत्तेत येणार आहे.

ठाकरे-ठाकरे मध्ये खूप फरक आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहे, असे म्हणत मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांना मंत्री असताना काही केले नाही. पण तरीही उभे राहतात. मात्र, काही जणांना डिपॉसिट जप्त करायची हौस असते टोला लगावला.

विरोधकांनी आरोप करा पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शेतकऱ्याबाबत बोलू नये. शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारींचा मोर्चा निघाला होता. गोवारी बांधवांना आज कोर्टाने न्याय दिला. मात्र कॉंग्रेस सरकारने तो न्याय दिला नाही. नाशिकमधून लाल बावटा घेवून शेतकरी आले होते. मी झेंड्याचा लाल रंग नाही त्यांच्या रक्ताचा लाल रंग बघितला आणि त्यांना मदत करण्याचे आदेश आमदार आणि मंत्र्याना मी दिले होते.
पण गोवारी मोर्चावर तुम्ही केलेल्या गोळीबाराचे रक्त तुम्ही धुतले पण जणता विसरली नाही. मला त्या घटनेची आजही लाज वाटते असे उद्धव ठाकरे म्हणाले.

कर्जमाफीसाठी प्रयत्न केले, मात्र मला कर्जमाफी नको कर्जमुक्ती पाहिजे. माफी आरोपीला देतात मी उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचा सुपुत्र वचन देतो की, शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण देणार हे माझं वचन असल्याचे ते जाहीर सभेत बोलले. मत मागताना शेतकर्यांच्या घरात जावून आत्महत्या न करण्याबाबत सांगा, 'मी आहे असे म्हणून, आधार द्या. राहूल गांधी स्वतःला आजच पंतप्रधान समजत आहे. राहूल गांधी ३७० कलम काढणार नाही म्हणतात त्यांना लाज नाही वाटत. काश्मीरचे ३७० कलम काढणार. या देशात राहायचे असेल तर देशाचे तुकडे झाले पाहिजे म्हणणाऱ्यांचे तुकडे केले पाहिजे असा घणाघात त्यांनी विरोधकांवर केला. देशद्रोहाचा कायदा काढण्याची भाषा कॉंग्रेस करतात. काही लोकांच्या दबावात हे कलम काढणारेच देशद्रोही आहे. भाजप व सेना यांच्या युतीवर शिवसेना लाचार झाली असा म्हणणारे आहेत. मात्र, मी देशासाठी युती केली हे ही त्यांनी खांभिरपणे सांगितले.

मला शेतीतले कळत नाही, असे आरोप केले गेले. मला शेतीतले कळत नाही मात्र शेतकऱ्यांचे अश्रू कळतात ते काँग्रेस व राष्ट्रवादी काँगेसचे आघाडीला कळत नाही. ५६ जणांनी एकत्र येवून एकमुखाने पंतप्रधानांचे नाव घोषित केले तरी राज्यातील ४८ जागा शिवसेना-भाजपा युतीच जिंकनार आहे.आम्हाला काही हवंय म्हणून युती केली नाही तर आम्हाला काहीतरी द्यायला युती केली असल्याचे उद्धव ठाकरेंनी यवतमाळ येथील जाहीर सभेत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com