अमृता फडणवीसांना आवर घाला, या शिवसेना नेत्याने पाठवले आरएसएसला पत्र

Thursday, 27 February 2020

अमृता फडणवीसांनी नुकीतीच कोषातल्या रेशीम किड्याशी तुलना करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. अमृता फडणवीसांनी फडणवीसांची बाजू घेण्यासाठी अनेक वेळा शिवसेनेवर टिका केली आहे. या मुद्याला हात घालत किशोर तिवारींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पत्र पाठवून त्यांना आवरण्याची विनंती केली आहे. त्यासाठी किशोर तिवारींनी भाजपातल्या ज्येष्ठ नेत्यांच्या जोडीदाराच्या आदर्श वर्तनाची आठवण करून दिली.

नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना आवरा अशा आशयाचे पत्र वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांना लिहिले आहे.

अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्या सोशल मीडियावरून राजकीय कोटी देखील करत असतात. यामुळे नेटकरी त्यांना चांगलेच फैलावर घेत असतात. 

आपल्या वक्तव्याने अमृता फडणवीस जर असेच संबंध वाईट करत राहिल्या, तर देवेंद्र फडणवीस कसे मुख्यमंत्री होतील? असे तिवारी यांनी पत्रात म्हटले आहे. यासाठी त्यांनी जशोदाबेन, रश्मी ठाकरे, कांचन गडकरी, शर्मिला ठाकरे ह्यांच्या वागण्याचे दाखले देखील दिले आहेत.

अमृता फडणवीसांनी नुकीतीच कोषातल्या रेशीम किड्याशी तुलना करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. अमृता फडणवीसांनी फडणवीसांची बाजू घेण्यासाठी अनेक वेळा शिवसेनेवर टिका केली आहे. या मुद्याला हात घालत किशोर तिवारींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पत्र पाठवून त्यांना आवरण्याची विनंती केली आहे. त्यासाठी किशोर तिवारींनी भाजपातल्या ज्येष्ठ नेत्यांच्या जोडीदाराच्या आदर्श वर्तनाची आठवण करून दिली.

या कारणामुळे डॅडीला पॅरोल मंजूर... ४५ दिवस राहणार बाहेर

भैय्याजी जोशींना भेटणार
अमृता फडणवीसांकडून हे अपेक्षित नाही. त्यांनी त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य थोड्या दिवसासाठी आवरावे.  अशाने देवेंद्र फडणवीस यांचे करियर खराब होईल. भाजपच्या खूप ज्येष्ठ नेत्यांना ही चिंता आहे. प्रवक्ते भूमिका मांडतील, असे या गटाचे ही म्हणणे आहे. पत्नीने खुलासे का करावे? असा सवाल तिवारींनी केला आहे. तिवारी म्हणाले की, या संदर्भात मी भैय्याजी जोशींना भेटणार आहे.  देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा नंतर माज आला. आधीचे देवेंद्र आता राहिले नाहीत.
-  किशोर तिवारी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena leader wrote letter to bhaiyaji joshi